Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीभुजबळांनी सिपेट प्रकल्पाला खिळ घालण्याचा प्रयत्न केला

भुजबळांनी सिपेट प्रकल्पाला खिळ घालण्याचा प्रयत्न केला

खा. हेमंत गोडसे यांची माहिती

नाशिक (प्रतिनिधी) : दर वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करणाऱ्या ‘सिपेट’ या केंद्र शासनाच्या प्रकल्पास तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच विरोध केल्याचे समोर आले आहे. ‘सिपेट’ प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याचा बाऊ करत भुजबळ यांनी विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला.

सदर प्रकल्प गोवर्धन शिवारातील प्रास्तावित जागेवर होऊ नये, असे पत्र भुजबळ यांनी शासनाला देत विकासाला विरोध केल्याने त्यांच्या विरोधात शहरवासियांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

भुजबळ यांचा हा सर्व खटाटोप पर्यावरणाच्या संर्वधानासाठी नव्हे, तर प्रस्तावित ‘सिपेट’ प्रकल्पालगत शेजारच्या जागेत असलेल्या त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे महत्त्व कमी होऊ नये व विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संस्थेच्या बाजूच्या जागेत असलेल्या ग्रिनरीची शेड तशीच कायम रहावी यासाठी केल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. केंद्राने ‘सिपेट’ प्रकल्पासाठी पनवेलची निवड केली होती. सदर प्रकल्प पनवेल येथे होणार होता. मात्र ३ वर्षांच्या प्रयत्नानंतरही प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होऊ न शकल्याने प्रकल्प राज्याबाहेर नेण्याचा निर्णय केंद्राच्या विचाराधिन होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -