Wednesday, May 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजकायदा नाही ज्ञात, फसले अधिकाऱ्यांच्या जाळ्यात...

कायदा नाही ज्ञात, फसले अधिकाऱ्यांच्या जाळ्यात…

  • क्राइम : अॅड. रिया करंजकर

माणसासोबत या पृथ्वीवर असणाऱ्या इतर वन्य जाती- प्राणी यांनाही संरक्षण देण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. वन्य जाती-प्राण्यांचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याचबरोबर माणसासोबत राहणारे पाळीव प्राणी यांना पण कायद्याने संरक्षण दिलेले आहे. कारण त्यांनाही पृथ्वीवर राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. काही वन्यप्राणी हे लोप पावत चाललेले असल्याने त्यांचे संवर्धन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. वन्य जीवन संरक्षण अधिनियम १९७२ सुरक्षितेचा व संवर्धनाचा कायदा वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेला आहे, याची आजपर्यंत सामान्य जनतेलाही जाणीव नाही.

रफिक हा आपल्या मित्रांसोबत विहिरीच्या ठिकाणी आंघोळीला जात असे. त्या दिवशी अांघोळ झाल्यानंतर आपले कपडे सुकत घालत असताना, एका झाडाखाली त्याला मगरीचे नुकतेच जन्मलेले पिल्लू दिसले. त्याने ते पिल्लू उचलले आणि आपल्या मित्रांसोबत ते आपल्या घरी आणून एका बॉक्समध्ये ठेवून दिले आणि आपल्या ओळखीच्या लोकांना त्याचे फोटो पाठवले. सागर नावाच्या मित्रालाही त्याने ते पाठवले. सागरने ते फोटो आपल्या दुसऱ्या मित्राला पाठवले. त्यावर त्यांनी हे पिल्लू विकणे आहे असं काही लिहिलेलं नव्हतं असं सागरचं मत होतं. फॉरेस्ट अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी कळल्यानंतर सागरला प्रथम गाठले आणि आम्हालाही पिल्लू विकत घ्यायचे आहे असं सांगितलं. त्याने ज्या मित्राकडे आहे त्या मित्राचं मी घर दाखवतो असं सांगितलं व तो त्या अधिकाऱ्यांसोबत रफिकच्या घरी आला व सागर याने रफिकला सांगितलं की हे मगरीचे पिल्लू विकत घ्यायला आलेले आहेत. रफिकने बॉक्समधून मगरीचे पिल्लू दाखवताच फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्याचवेळी त्या मगरीच्या पिल्लासह रफिक आणि सागर या दोघांना रंगेहात पकडले. त्या दोघांनाही नेमकं काय झालं आहे ते समजलं नाही. आणि नंतर त्यांना कळाले की ते फॉरेस्ट अधिकारी ग्राहक म्हणून आलेले होते. त्या दोघांनाही ठाण्यामध्ये घेऊन आले. तर सागर याने सरळ सांगितलं होतं रफिक यांनी मला फोटो पाठवले ते फोटो मी मित्राला पाठवले होते पण ते पिल्लू विकायचे नसून रफिककडे मगरीचे पिल्लू आहे एवढेच सांगितलं होतं.

माझा त्या पिल्लाशी काही संबंध नाही. सोशल मीडियावर हे पिल्लू विकायचे आहे असं टाकल्यामुळे ही बातमी आमच्यापर्यंत पोहचल्यामुळे आम्हीच ग्राहक म्हणून आलो. आणि तुम्हाला विक्री करताना आम्ही पकडलं. त्याने आपल्या मोबाईलमधून फोटो पाठवलेले आणि रफिकने त्याला फोटो पाठवलेले दाखविले पण विक्री करायची आहे असं मी लिहिलं नव्हतं असं सागर काकुळतीला येऊन अधिकाऱ्यांना बोलू लागला. अधिकाऱ्यांनी त्या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना आपल्या घरातल्या लोकांशी संपर्क साधता येईना. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांनी जी कंप्लेंट तयार केली त्याच्यामध्ये या दोघांनाही ते पिल्लू जास्त किमतीमध्ये विकायचे होते असा उल्लेख केला. रफिकने ते पिल्लू आणले होते. त्याला ते विकायचे होते. फक्त सागरने ते फोटो सोशल मीडियावर टाकले एवढा त्याचा गुन्हा होता. पण हा सोशल मीडियावर टाकलेले फोटो त्याला गुन्हेगार म्हणून गेले. मगर आणि मगरीचे पिल्लू हे ०१ मध्ये येतं याची त्यांना कल्पनाच नव्हती. वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा आहे याची त्यांना जाणीव नव्हती. कायद्याची जाणीव नसल्यामुळे रफी आणि मित्राला या गुन्ह्यात अडकवलं. मगरीचे छोटेसे पिल्लू पाच दिवसाची कस्टडी देईल याची कल्पना दोघांनाही नव्हती. नाही त्यासाठी बेल करावी लागेल हेही त्यांना माहीत नव्हतं. एवढासा छोटासा जीव त्या दोघांनाही गुन्हेगार ठरवून झाला. प्राण्यांसाठी कायदा आहे याची जाणीव नसल्यामुळे दोघेही कायद्याच्या फंदात अडकले. एवढेच नाही तर आता दोघांनाही आठवड्यातून पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागते. त्यांना माहीत नसलेली गोष्ट करून बसले आणि कायद्याच्या जखड्यात मात्र अडकले.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -