Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाT-20 world cup: मोहम्मद शमी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर, पंतसमोर ठेवली ही अट

T-20 world cup: मोहम्मद शमी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर, पंतसमोर ठेवली ही अट

मुंबई: टीम इंडियाने(team india) नुकतीच इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. आता भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतील. याची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधी गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार नाही आहे.

शमीची गेल्याच महिन्यात सर्जरी झाली होती. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२४च्या माध्यमातून प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पंतला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पंत डिसेंबर २०२२मध्ये एका भीषण कार अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे.

ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि केएल राहुल यांच्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी अपडेट दिले आहे. शाह यांनी सांगितले की शमी या वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. भारत सप्टेंबरमध्ये दोन कसोटी आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद करणार आहे. शमीने भारतासाठी शेवटचा सामना क्रिकेट वर्ल्डकप २०२३मध्ये खेळला होता.

शमी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

जय शाह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, शमीची सर्जरी झाली आहे आणि तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेसाठी शमीचे पुनरागमन शक्य आहे. केएल राहुलला इंजेक्शनची गरज होती. त्याने रिहॅब प्रक्रिया सुरू केली आहे आणि तो एनसीएमध्ये आहे. राहुलला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धचे कसोटी मालिकेतील शेवटचे चार सामने खेळू शकला नव्हता. लंडनमध्ये उपचार केल्यानंतर तो लखनऊ सुपरजायटंससाठी खेळण्याची शक्यता आहे.

पंतसमोर ठेवली ही अटक

बीसीसीआय सचिव म्हणाले ऋषभ पंत आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी तयार आहे. तो चांगला फलंदाजी करत आहे. तो चांगली किपिंगही करत आहे. आम्ही लवकरच त्याला फिट घोषित करू. तर तो टी-२० वर्ल्डकप खेळू शकला तर ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. जर तो किपिंग करत असला तर वर्ल्डकप खेळू शकतो. आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -