Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीSolapur News : सोलापूर हादरलं! माजी आमदाराच्या कार्यालयात वृद्धाने केली आत्महत्या

Solapur News : सोलापूर हादरलं! माजी आमदाराच्या कार्यालयात वृद्धाने केली आत्महत्या

सोलापूर : सोलापुरात काल दुपारच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना (Solapur News) घडली. दत्तनगर परिसरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयात एका ८० वर्षीय वृद्धाने गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केली. अल्लाउद्दीन शेख असं या वृद्धाचं नाव आहे. सकाळच्या सुमारास त्याने आमदार आडम यांची भेट घेतली होती. मात्र, दुपारी लगेचच त्यांचा मृतदेह कार्यालयात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नरसय्या यांच्या दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) आणि सिटू संघटनेच्या लालबावटा कार्यालयामध्ये ही घटना घडली. या घटनेच्या वेळी कार्यालयात कोणीही नव्हते. मात्र घटनेविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास शेख यांनी नरसय्या आडम यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास कौटुंबिक कारणास्तव नरसय्या आडम हे कार्यालयातून बाहेर पडले. त्याच सुमारास कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. त्याचवेळी वृद्ध अल्लाउद्दीन शेख यांनी कार्यालयातील एका खोलीत स्वत:ला बंद करत गळफास घेतला. शेख यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान संबंधित व्यक्ती हा सध्या आमचा कार्यकर्ता नसून काही वर्षांपूर्वी त्यांनी माकपसाठी काम केले होते असे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मागील काही वर्षांपासून त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नव्हता, असे नरसय्या आडम यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कसा आला होता अल्लाउद्दीन शेख आणि नरसय्या आडम यांचा संबंध?

अल्लाउद्दीन शेख हे १९७९ च्या सुमारास माकपच्या संपर्कात आले होते. गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी वाचवण्याच्या आंदोलनात शेख यांनी माकपच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. १९८५ मध्ये शेख यांनी माकपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक ही लढवली होती. मात्र, पुढे पक्ष सभासदत्व त्यांनी नूतनीकरण केले नाही. त्यानंतर शेख हे जनता दल, काँग्रेस अशा विविध पक्षांमध्ये कार्यरत होते. आडम यांचा कामगार, स्थानिकांमध्ये चांगला संपर्क आहे. त्यामुळे शेख यांच्यासोबत त्यांचा परिचय होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -