MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आता कांदिवली परिसरात सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुण आणि तरुणीला जोरदार धडक दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबई : दादर पश्चिम येथील प्लाझा सिनेमा परिसरात झालेल्या भीषण BEST बस अपघातात (Bus Accident) गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय वृशभ गुप्ता यांच्या कुटुंबाला दोन लाख ...
नेमकी घटना काय?
सोमवारी सकाळी ११:४० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गोराई डेपोतून सुटलेली एक इलेक्ट्रिक बेस्ट बस पोयसर डेपोजवळून जात होती. त्याच वेळी आदर्श हिरालाल यादव (२४) आणि सोनम मौर्य (२४) हे दोघे रस्ता ओलांडत होते. भरधाव वेगात असलेल्या बसने या दोघांनाही जोरदार धडक दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघाताचा भीषणपणा पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये उफाळलेल्या हिंसक आंदोलनांनी संपूर्ण ...
तरुणीची प्रकृती चिंताजनक
अपघातानंतर बस कंडक्टरने तातडीने दोघांनाही जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सोनम मौर्य हिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तर आदर्श यादव याच्या खांद्याला आणि डोळ्याच्या जवळ किरकोळ दुखापत झाली आहे.
Nashik News : रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर मुंबई नाका येथील छावा ...
पोलीस तपास सुरू
कांदिवली पोलिसांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून, बस चालकाच्या बेदरकारपणामुळे हा अपघात झाला का, या दिशेने तपास सुरू आहे.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात Mumbai : आजवर संजय राऊत यांच्या जे पोटात होते ते ओठावर यायला लागले आहे. उबाठा गट म्हणून आमचे वेगळे ...
बेस्टच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
एकाच दिवसात मुंबईत बेस्ट बसच्या दोन मोठ्या अपघातांच्या घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेस्टच्या बसेसच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे का, असा सवाल आता मुंबईकर उपस्थित करत आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी बेस्ट प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.






