भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
Mumbai : आजवर संजय राऊत यांच्या जे पोटात होते ते ओठावर यायला लागले आहे. उबाठा गट म्हणून आमचे वेगळे अस्तित्व असल्याचे सांगणाऱ्या संजय राऊत यांनी आज तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केले पाहिजेत असे वक्तव्य केले. उबाठा गट, राष्ट्रवादी पवार गट संपवून फक्त काँग्रेसच जिवंत ठेवायची सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधींकडून घेतली आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते.
PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी कॅडेट्स आणि माजी छात्रांसाठी कौशल्य ...
संजय राऊत नेहमी खोटे बोलतात. मात्र उबाठा गटाचे दहा खासदार हे उबाठा सोडून जाणार आहेत हे त्यांचे वक्तव्य खरे होणार आहे. लोकसभेत त्यांचे नऊ खासदार आहेत आणि दहावे खासदार स्वतः संजय राऊत राज्यसभेत आहेत. त्यामुळे हे दहाच्या दहा खासदार उद्धव ठाकरे आणि उबाठा गट सोडून वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाणार आहेत. काही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत तर काही संजय राऊतांसोबत काँग्रेसमध्ये जातील, असे श्री. बन यांनी सांगितले.नारी सन्मान योजना किंवा नारी शक्ती वंदन अभियानाबद्दल संजय राऊत यांना बोलण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करीत बन म्हणाले, ज्या असभ्य भाषेत तुम्ही नारी सन्मानाबद्दल वक्तव्य करता ते पाहून जनतेनेच तुमची घंटा वाजवलेली आहे. तुमचे अस्तित्व नाकारत तुम्हाला पूर्ण झोपवले आहे. ज्या पाटकर ताईंचे एक पुस्तक येणार म्हणून त्यांना धमक्या देणारे, शिव्या देणारे तुम्ही. तुम्हाला नारी सन्मानाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांसाठी न्यायाधीश, न्यायमूर्ती वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अभ्यास करत असतात, असे सांगू नवनाथ बन म्हणाले की, हे काँग्रेससह वेगवेगळे सरकार असतानाच्या काळातही झाले आहे. मात्र पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा उद्धव ठाकरे कुठल्या शहरामध्ये गेले होते? तुम्हाला पहलगाममधल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही वेळ नव्हता. कारण तुम्ही सहकुटुंब लंडनवारी करत होता. लंडनवारीच्या गप्पा करणाऱ्या राऊतांनी याबद्दल एकदा पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी आणि नंतर न्यायाधीश लंडनमध्ये जातात की न्यूयॉर्कमध्ये याबद्दल बोलावे.
Manmad : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व अपुऱ्या उपचारांमुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित डॉक्टर व ...
मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता
लातूरमध्ये एका शेतकऱ्यांकडे बैल नसल्याने स्वतःच्या पत्नीला नांगराला जुंपण्याची दुर्दैवी वेळ आली. या अतिशय संवेदनशील घटनेची बातमी पाहून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. देवेंद्रजी फडणवीस यांच्या तत्परतेमुळे त्या शेतकऱ्याला मदत मिळत बैल उपलब्ध झाला. राज्यात अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्यावर दुर्दैवी वेळ आली तर हे सरकार मदतीला धावून जाते. उद्धव ठाकरे यांनी फसवी कर्जमाफी योजना केली होती. कुठलीही निवडणूक नसताना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना वीज देण्याचे काम केले. कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा भाऊ कोण असेल ते तर देवाभाऊ आहेत, असेही श्री. बन यांनी सांगितले.






