Wednesday, May 8, 2024
Homeमहत्वाची बातमीआंबा पिकासाठी सिंधुदुर्गची निवड

आंबा पिकासाठी सिंधुदुर्गची निवड

‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजना

सिंधुदुर्ग : आत्मनिर्भर अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची आंबा पिकासाठी निवड करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरीता प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के म्हणजे किमान १० लाख रूपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. तर स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक संस्था उत्पादक सहकारी संस्था यांनाही अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

२०२१-२२ मध्ये या योजने अंतर्गत भांडवली गुंतवणूकी करिता वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी ३० डिसेंबर पर्यंत ६८ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी २५ सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. तर १६ आराखडे बँक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरुवात झाली असून आतापर्यंत ८ प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.

इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी कृषि विभागामार्फत ३ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी (स्वयं सहाय्यत गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या एमआयएस पोर्टलवर नोंदणी करुन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी जिल्ह्यात ७ जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
……

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -