Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीRailway Megablock : रेल्वे प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! 'या' दिवसांत CSMT स्थानकात...

Railway Megablock : रेल्वे प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ‘या’ दिवसांत CSMT स्थानकात मेगाब्लॉक

‘या’ रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना बसणार फटका?

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चक्क आठवडाभर या विभागात रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दिली आहे. तसेच या विस्तारीकरणामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना या गोष्टीचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विस्तारीकरणादरम्यान २३ मे ते ३१ मेपर्यंत दररोज रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या चार तासांच्या रात्रकालीन मेगाब्लॉकमुळे प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस अशा रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, आठवडाभर घेण्यात येणाऱ्या रात्रकालीन ब्लॉकमुळे भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्यासाठी लोकल उपलब्ध राहणार नाही. तर मेगाब्लॉक लागण्यापूर्वी सीएसएमटीहून धीम्या मार्गावरील १२.१४ वाजताची कसारा लोकल शेवटची असणार आहे. त्याचबरोबर सीएसएमटी ते कर्जत ही पहाटे ४.४७ वाजताची पहिली लोकल असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -