मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ भेट घेत केली विचारपूस
ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी (Arunatai Gadkari) गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना अचानक पॅरालिसीसचा अॅटॅक आला होता. त्यामुळे त्यांना ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
एकनाथ शिंदे यांनी अरुणाताईंवर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती व त्यांच्यावर सुरू असलेल्या औषधोपचाराबद्दल जाणून घेतले. यावेळी अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांना केली. अरुणाताई गडकरी यांच्यावर आता ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अरुणाताई गडकरी यांना पॅरालिटीक अॅटॅक आलेला आहे. आता त्यांना पाहायला आलो होतो. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांना ज्युपिटरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाताई गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे. ज्युपिटरमध्ये अधिक सुविधा उपलब्ध असल्यानं तिथं उपचार करणा आहोत. आता अरुणाताईंच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.