Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024पंजाब किंग्जचा दिल्लीवर ४ गडी राखून रोमहर्षक विजय

पंजाब किंग्जचा दिल्लीवर ४ गडी राखून रोमहर्षक विजय

लिव्हिंस्टोनचा विजयी षटकार; सॅम करन विजयाचा शिल्पकार

अर्शदीप-हर्षलने प्रत्येकी दोन गडी केले बाद

चंदीगड : पंजाब किंग्जने आयपीएल २०२४ ला विजयाने सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ने मोसमातील पहिल्या दुहेरी हेडर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (डीसीचा) ४ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. आयपीएल मधील दुसरा सामना शनिवारी महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदिगड येथे पार पडला.या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. ज्यामध्ये पंजाब किंग्जने सॅम करनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सनी मात करत आपला पहिला विजय नोंदवला. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक पोरेलच्या वादळी खेळीच्या जोरावर ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १९.२ षटकांत ६ गडी गमावून विजय मिळवला.

दिल्लीच्या संघाने देखील दमदार सुरूवात करत कर्णधार पंतला मोठा दिलासा दिला. मात्र पंजाबच्या वेगवान गोलंदाजांनी दिल्लीच्या चौफेर उधळलेल्या घोड्यांना आवर घालण्यास सुरूवात केली. अर्शदीप, हर्षल पटेल अन् रबाडाने टॉप ऑर्डर उडवल्यानंतर ज्या खेळाडूची ४५३ दिवस प्रतिक्षा होती तो खेळाडू म्हणजे कर्णधार ऋषभ पंत मैदानात येताच टाळयांच्या कडकडाटत त्याचे स्वागत करण्यात आले. पंतने आपली कमबॅक इनिंग खेळण्यास सुरूवात केली मात्र त्याने कशाबशा १८ धावा केल्या. हर्षल पटेलच्या एका बाऊन्सरने त्याला चकवले. पंतची २ चौकारांसह केलेली १८ धावांची खेळी संपुष्टात आली. पंत बाद झाला त्यावेळी दिल्लीचे रनरेट चांगले होते. मात्र डाव गडगडला अन् अवस्था १७ षटकात ७ बाद १३८ धावा अशी झाली.

बंगलाच्या अभिषेक पोरेलने पंजाबच्या भ्रमाचा भोपळा फोडला. त्याने शेवटच्या तीन षटकात होत्याचे नव्हते केले. त्यांने १० चेंडूत नाबाद ३२ धावा करणाऱ्या पोरेलने पंजाबचा दिवसातील स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार ठोकत २५ धावा केल्या. प्रभसिमरन आणि सॅम करन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी रचत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र कुलदीप यादवने प्रभसिमरनला २६ धावांवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला.

इशांत शर्माने शिखरचा त्रिफळा उडवला

पंजाबने दिल्लीच्या १७५ धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. १६ चेंडूत २२ धावा करणाऱ्या शिखर धवनचा इशांत शर्माने त्रिफळा उडवत पंजाबला पहिला धक्का दिला. दिल्ली कॅपिटल्सची अवस्था बिकट असताना अभिषेक पोरेल हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्यासाठी आला. त्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलची बॉलिंग फिगरच बदलून टाकली. हर्षल पटेलचा भेदक मारा, चांगल्या सुरूवातीनंतर दिल्लीचा डाव गडगडला. दिल्ली कॅपिटल्सने धडाकेबाज सुरूवात केली होती. पंत बाद झाला त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या ४ बाद १११ धावा झाल्या होत्या. तुफानी सुरूवातनंतर ऋषभ पंतच्या संघाला पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मोठा धक्का दिला. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीला वेगवान सुरुवात करून तीन षटकांत धावसंख्या ३० च्या पुढे नेली. पण चौथे षटक टाकायला आलेल्या अर्शदीपने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्शला झेलबाद केले. १२ चेंडूत २० धावा करून मार्श बाद झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -