Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMHADA : पुणे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर!

MHADA : पुणे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर!

पुणे : म्हाडाच्या (MHADA) पुणे घरांसाठीची सोडत अखेर जाहीर झाली आहे. येत्या 05 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय सोडतीत विजेत्यांची नावं घोषित केली जातील. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील 5863 घरांसाठी लॉटरी जाहीर झाली होती. त्याची संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे 05 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.

या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 5863 सदनिकांसाठी सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त झाले. म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अशोक पाटील आदी या सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -