Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमPune car accident : 'अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर पोर्शे चालवत होता' बापलेकाचा...

Pune car accident : ‘अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर पोर्शे चालवत होता’ बापलेकाचा अजब दावा!

मुलासह गाडीत असलेल्या दोन मित्रांची व त्यांच्या पालकांचीही चौकशी होणार

पुणे : पुण्यातील कार अपघातप्रकरणी (Pune car accident) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच ज्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडलं तो वेदांत अग्रवाल (Vedant Agarwal) व त्याचा धनिक बाप आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) या प्रकरणी पोलिसांना भरटकवत असल्याचे समोर येत आहे. काल अग्रवालांच्या वकिलांनी पोर्शे कार (Porsche car) बिघडली होती व त्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती असा दावा केला. पण त्यामुळे बिघडलेली कार वडील आपल्या मुलाला का चालवायला देतील? असा साहजिक प्रश्न उपस्थित झाला. यानंतर आता बापलेकाने ती कार अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर चालवत होता, असा दावा केला आहे. तर ड्रायव्हरने मात्र याच्या परस्परविरोधी जबाब नोंदवला आहे.

काल झालेल्या सुनावणीत ड्रायव्हरने आधीच ही कार आपल्याला विशाल अग्रवाल यांनीच मुलाकडे चालवण्यासाठी दे, असं सांगितल्याचा दावा केला होता. मुलगा कोझी पबमधून आपल्या दोन मित्रांसह पार्टी करुन परतल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नव्हता, त्यामुळे ड्रायव्हरने त्याच्या वडिलांना फोन करुन हे कळवले. मात्र, त्याच्या वडिलांनीच मुलाला कार चालवू देत असं सांगितल्याने ड्रायव्हरचा नाईलाज झाला आणि त्याने कार चालवायला दिली, असा जबाब ड्रायव्हरने नोंदवला आहे.

यानंतर आता बापलेकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुलगा नाही तर अपघाताच्या वेळी ड्रायव्हरच गाडी चालवत होता, हा जबाब गोंधळवून टाकणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या मुलाच्या दोन मित्रांची व त्यांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार आहे. या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं आहे. यात हे सगळे कुठे गेले होते?, पार्टीत काय केलं?, परत येताना नक्की कोण होतं?, गाडी कोण चालवत होतं? या सगळ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांची देखील चौकशी होणार

या प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल. दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली? यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का? त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली? या सगळ्याचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -