Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीWeather Update : मुंबई तापली पण 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा!

Weather Update : मुंबई तापली पण ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा!

विजांच्या कडकडाटासह कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : पावसाळा (Monsoon) तोंडावर आला असला तरीही उकाड्यामुळे अंगाची काहीली होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे (Heatwave) नागरिक हैराण झाले आहेत. गरज असल्यास बाहेर पडण्याचं, तसेच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून केलं जात आहे. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) मोठी अपडेट दिली आहे. आज राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असला तरीही काही भागात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

या भागात पावसाचा इशारा

हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा, हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यात उष्ण लाटेचा यलो अलर्ट

नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईमध्ये देखील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

‘या’ राज्यात उष्णतेचा रेड अलर्ट

उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील ५ दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४८.८ अंशावर पोहोचलं आहे. तर जैसलमेरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर तापमान ५३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. राजस्थानमधील वाढत्या उष्णतेमुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून उष्णतेची लाट कायम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -