Thursday, May 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘एक दोन तीन चार’मध्ये निपुण अन् वैदेही परशुरामीची हटके लव्हस्टोरी

‘एक दोन तीन चार’मध्ये निपुण अन् वैदेही परशुरामीची हटके लव्हस्टोरी

ऐकलंत का!: दीपक परब

मराठी मनोरंजनसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष खूपच कमाल होते. कोरोनानंतर प्रेक्षकांची पावले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचे काम मराठी मनोरंजनसृष्टीने केले. अनेक मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवले. आता पुढच्या वर्षाची सुरुवातदेखील मनोरंजनात्मक होणार आहे. नुकताच ‘एक दोन तीन चार’ या मराठी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. एक नवीकोरी कथा असलेला ‘एक दोन तीन चार’ हा सिनेमा नवीन वर्षात ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या मल्टिस्टारकास्ट सिनेमासोबतच ‘एक दोन तीन चार’ या सिनेमाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मुरांबा’ या बहुचर्चित सिनेमानंतर वरुण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील सिनेमा असणार आहे, तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहे.

‘एक दोन तीन चार’ या सिनेमात दमदार कलाकारांची फौज असणार आहे. सिनेमातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिने केली आहे, तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीने साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तर या सिनेमाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो, हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटांतील प्रेक्षकवर्गासाठी ही नववर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -