Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाMohammed Shami: मोहम्मद शमीला करावी लागली पायाची सर्जरी, तब्येतीबाबत दिले हे अपडेट

Mohammed Shami: मोहम्मद शमीला करावी लागली पायाची सर्जरी, तब्येतीबाबत दिले हे अपडेट

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(mohammad shami) बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो वर्ल्डकप २०२३ नंतर टीम इंडियामध्ये दिसला नाही. शमीला दुखापत झाली होते. त्यामुळे तो खूप त्रस्त होता.

दरम्यान, मोहम्मद शमीने तब्येतीबाबतचे ताजे अपडेट सोशल मीडियाद्वारे शेअऱ केले आहेत. शमीने सोशल मीडियावर सांगितले की त्याच्या पायाचे ऑपरेशन झाले आहे. ही सर्जरी यशस्वी झाली. शमीने हॉस्पिटलमधील काही फोटो शेअरही केले आहे.

शमीने फोटो शेअर करताना म्हटले की, नुकतेच माझ्या टाचेचे ऑपरेशन झाले आहे. ठीक होण्यासाठी वेळ लागेल. मात्र लवकरच मी माझ्या पायावर उभा राहीन’. शमीच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे तो बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर होता. शमीच्या पुनरागमनाला आता अधिक वेळ लागेल. शमीला इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये खेळता येणार नाही. त्याच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सला मात्र मोठे नुकसान होणार आहे.

 

 

शमीने भारतासाठीचा शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. हा वर्ल्डकपमधील फायनल सामना होता. या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात शमीने एक विकेट घेतला होता. तर या वर्ल्डकपमध्ये शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने ७ सामन्यात २४ विकेट घेतल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -