Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणMNS: मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही, बाळा नांदगावकरांचा निर्धार

MNS: मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही, बाळा नांदगावकरांचा निर्धार

पेण : गेली १३ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (mumbai-goa highway) सुरळीत झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (maharashtra navnirman sena) स्वस्त बसणार नाही असा निर्धार माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मुंबई गोवा महामार्गावरील तरणखोप-पेण-खारपले येथील जागर यात्रेत केला आहे. एकूण आठ टप्प्यात ही जागर यात्रा आयोजित करण्यात आली होती.

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम होण्याकरिता व सरकारला जाग आणण्यासाठी मनसेने रविवारी युवा नेते अमित राज ठाकरे आणि माजी गृहमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते कोलाड जागर पायी यात्रा सुरू केली. या यात्रेत मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी शेकडोच्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने अनेक नागरिकांनी आणि विविध संघटनांनीही या जागर यात्रेत सहभाग घेतला होता.

पेण तालुक्यातील तरणखोप येथून सुरू झालेल्या या जागर यात्रेत बाळा नांदगावकर यांनी सांगितले की कोकण हा महत्त्वाचा पर्यटन स्थळ असून गेली अनेक वर्ष या कोकणामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना या महामार्गाच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत असून गेली १३ वर्ष आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही हा रस्ता होत नाही. या महामार्गाने आजतागायत अनेकांचे जीव गेले आहेत. कुटुंब उध्वस्त झाली मात्र रस्त्याची दुरावस्था जैसे थे आहे. आजपर्यंत अनेक पक्षाचे सरकार बसले परंतु महामार्गाची व्यथा संपतच नाही. त्यामुळे कोकणवाशींच्या करीता मनसे रस्त्यावर उतरली आहे. जो पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत होत नाही, तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवीला.

दरम्यान, महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यात आला आहे. एकाच मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्याने त्यातच मोठ मोठाले खड्डे असल्याने दहा ते बारा किलोमीटर लांब पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. यावेळी युवा नेते अमित राज ठाकरे यांनी पळस्पे ते खारपाडा आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पेण तरणखोप ते खारपाले अशी पदयात्रा केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, शालोम पेणकर, जनार्दन पाटील, नागेश गावंड, सुदेश संसारे, महिला आघाडीच्या सपना देशमुख, अनिशा गावंड, अमेय पाटील आदिंसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -