Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीMhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील ४०८२ घरांसाठी आज सोडत! पहा थेट...

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील ४०८२ घरांसाठी आज सोडत! पहा थेट प्रक्षेपण

मुंबई : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे आज १४ ऑगस्ट रोजी म्हाडाच्या (Mhada) घरांची सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ४०८२ घरांसाठी काढण्यात येणार आहे.

आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सदनिकांच्या विक्रीची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

२२ मे २०२३ रोजी या ४०८२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव सायन येथे उभारण्यात आलेल्या ४०८२ घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे.

दरम्यान या अगोदर मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता देखील तब्बल एक लाख २० हजार १४४ अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

हा सोडत कार्यक्रम व्यापक स्तरावर ठेवण्यात आला आहे. तसेच अर्जदारांना सोईस्कर रित्या पाहता यावा यासाठी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात एलईडी स्क्रिन्स लावण्यात येणार आहेत.

तसेच https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -