Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडी‘सूक्ष्म अभ्यासाने पत्रकार समृद्ध’

‘सूक्ष्म अभ्यासाने पत्रकार समृद्ध’

उल्हासनगर  : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तीस ते चाळीस वर्षांत छापील पत्रकारिता, संगणकीकृत ई-मेल पत्रकारिता आणि सध्याची डिजिटल पत्रकारिता या तीन ट्रेंडचा अनुभव घेत, समाजात होत असलेल्या सूक्ष्म बदलांचा अभ्यास करून पत्रकार खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहेत, अशी भावना ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल केदारे यांनी उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित बाळकृष्ण जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केली.

पत्रकारांनी प्रत्येक परीक्षेसाठी स्वत:ला अपडेट करणे गरजेचे आहे. उल्हासनगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. डिजिटल पत्रकारितेचे आक्रमण होऊनही मुद्रित पत्रकारितेची विश्वासार्हता कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार बालाजी किणीकर, नगरसेवक धनंजय बोडरे, रमेश चव्हाण, राजेश वधारिया, शेखर यादव, संजय राजगुरू, गुलाब पवार, सुनील इंगळे, शिवाजी वाघ, सुरेश चौहान, नंदकुमार चव्हाण, महेश रोकडे, आकाश सहाणे, प्रकाश सोनवणे, सोनू शिंदे, सोनू हटकर, सॅमसन घोडके, अशोक सिरशाट, अनिल मिश्रा आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -