Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023२०-३० धावा आणखी असत्या तर...वर्ल्डकपमध्ये पराभवानंतर रोहित शर्माने व्यक्त केले दु:ख

२०-३० धावा आणखी असत्या तर…वर्ल्डकपमध्ये पराभवानंतर रोहित शर्माने व्यक्त केले दु:ख

मुंबई: टीम इंडियाचे वर्ल्डकप(world cup 2023) जिंकण्याचे स्वप्न रविवारी भंग झाले. पराभवानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर अतिशय दु:खी दिसले. रोहित मैदानातून जाताना भावूक झाला. विराटलाही पराभवाचे दु:ख लपवता आले नाही. जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजला सांभाळण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या सहा विकेटच्या पराभवानंतर सांगितले की विश्वचषकाच्या फायनलमध्ये फलंदाजी चांगली झाली नाही ज्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र त्यांना संपूर्ण संघावर गर्व आहे.

रोहित आणि टीम इंडियाच्या खेळाडूंसह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर वर्ल्डकपमधील पराभवाचे नैराश्य साफ दिसत होते. रोहितने सामन्यानंतर सांगितले की टीम इंडिया अखेर का चुकली. सामन्यानंतर रोहित म्हणाला, सामन्याचा निकाल भले आमच्याबाजूने लागला नाही मात्र आम्हाला माहीत आहे की आमचा दिवस चांगला नव्हता. मला संघावर गर्व आहे.

अहमदाबादमध्ये पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेला भारतीय संघ २४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावर रोहित शर्मा म्हणाला, मी इमानदारीने सांगू तर स्कोरमध्ये आणखी २०-३० धावा जास्त असत्या तर बरे झाले असते. जेव्हा केएल राहुल आणि विराट कोहली फलंदाजी करत होते तेव्हा वाटत होते की आम्ही २७०-२८० पर्यंत पोहोचू मात्र आम्ही सातत्याने विकेट गमावले.

रोहितने सहाव्यांदा ऑस्ट्रेलिया चॅम्पियन झाल्याबद्दल म्हणाला, ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावल्यानंतर मोठी भागीदारी केली. २४० धावा केल्यानंतर आम्हाला वाटत होते की सुरूवातीचे विकेट आमच्या गोलंदाजांनी काढावेत मात्र श्रेय ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांना जाते.

टीम इंडियाचे सामना हरल्यानंतर झाले भावूक

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

विश्वचषकातील अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचे खेळाडू अतिशय भावूक दिसले.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -