Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीFraud: ३००ची लिपस्टिक आणि एक लाखाचा चुना...

Fraud: ३००ची लिपस्टिक आणि एक लाखाचा चुना…

मुंबई: ऑनलाईन फसवणुकीचे(online fraud) प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. फसवणूक करणारे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवत आहेत. यातच महाराष्ट्राच्या नवी मुंबईतून असेच एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. येथे ३१वर्षीय डॉक्टरला ई कॉमर्स पोर्टलवरून ३०० रूपयांची लिपस्टिक ऑर्डर केल्यानंतर तब्बल १ लाखांचा चुना लागला.

ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसांतच तिला कुरिअर कंपनीकडून एक मेसेज मिळाला. यात सांगितले गेले की त्यांची ऑर्डर डिलीव्हर झाली आहे. दरम्यान, जेव्हा तिला तिचे प्रॉडक्ट मिळाले नाही तेव्हा तिने कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. या दरम्यान महिलेला सांहितले की लवकरच तिचा ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क करून दिला जाईल.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून पिडीत महिलेला कॉलवर सांगण्यात आले की तिची ऑर्डर थांबवण्यात आली आहे आणि ऑर्डर रिसीव्ह करण्यासाटी तिला २ रूपये ट्रान्सफर करावे लागतील. दरम्यान, डॉक्टरांनी पैसे पाठवण्यात नकार दिले. मात्र महिलेने त्यास नकार दिले. अखेर त्या महिला डॉक्टरला एक वेब लिंक पाठवण्यात आली. यात ती डाऊनलोड करून त्यात आपला पत्ता आणि बँक डिटेल्स भरण्यास सांगण्यात आले.

यानंतर डॉक्टर महिलेला भीप यूपीआय लिंक बनवण्याबाबत एक मेसेज मिळाला. तिने तातडीने कॉल करणाऱ्यांना याबाबत विारले असता कॉल करणाऱ्यांनी आश्वासन दिले की पार्सल आता डिलीव्हर केले जाईल. दरम्यान ९ नोव्हेंबरला महिलेच्या बँक खात्यातून ९५ हजार आणि ५ हजार रूपये डेबिट झाले. जसे डॉक्टरांच्या खात्यातून पैसे डेबिट होण्याचा मेसेज मिळाला तिने नेरूळच्या सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -