Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीHeat stroke : निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटील कोसळले; उष्माघाताचा त्रास

Heat stroke : निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटील कोसळले; उष्माघाताचा त्रास

धाराशीव : आज धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भर उन्हात नेत्यांच्या सभेदरम्यान आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांना उष्माघाताच्या त्रासामुळे (Heat stroke) चक्कर आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असून ऐन उन्हाळ्यात उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना प्रचार करताना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राजकीय नेत्यांना प्रचार करावा लागत आहे.

धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे आज उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यामुळे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख उपस्थित होते. यावेळी सभा सुरू असतानाच कैलास पाटील यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर पडले. कैलास पाटील यांना उष्णाघाताचा त्रास झाल्यामुळे त्यांना चक्कर आली. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -