Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाHardik Pandya Brother : ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हार्दिक पांड्याच्या भावाला...

Hardik Pandya Brother : ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हार्दिक पांड्याच्या भावाला अटक!

काय आहे प्रकरण? 

मुंबई : सध्या जोरदार चर्चेत असलेल्या आयपीएल मधील मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) भावाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फसवणूक केल्याप्रकरणी हार्दिकच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांनी त्यांच्या सावत्र भावाविरोधात तक्रार केली होती. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

हार्दिक आणि कृणाल यांचा वैभव पांड्यासोबत पांड्या ब्रदर्सचा व्यवसाय होता.  मुंबईमध्ये त्यांचा व्यवसाय सुरु होता. पण या फर्ममधून वैभव पांड्या याने ४.३ कोटी रुपये वळते केले. याचा फटका हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना बसला, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खोटी सही करुन फसवणूक केल्याचा वैभव पांड्या याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय वैभव पांड्या याला मुंबई पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली.

नेमकं प्रकरण काय ? 

हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या यांनी २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यावसाय सुरु केला होता. कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या प्रत्येकी ४० टक्के भांडवल देतील, तर वैभव पांड्या २० टक्के भांडवल देईल, त्याशिवाय तो दैनंदिन कामकाज हाताळेल, असं ठरलं होतं. या कंपनीमधून मिळणारा नफा तिघांमध्ये समान प्रमाणात वाटला जायचा. पॉलिमर व्यवसाय व्यवस्थित सुरु असतानाच, वैभव पांड्या याने त्याच व्यापारात अन्य फर्म स्थापन केली. याबाबतची अन्य दोन सहकाऱ्यांना कोणताही कल्पना अथवा माहिती दिली नाही. एकाच वेळी दोन फर्म असल्यामुळे नफा कमी झाला. त्यामुळे जवळपास तीन कोटींचे नुकसान झाले. वैभव पांड्याने आपल्या नफ्याची टक्केवारीही गुपचूप वाढवली. त्यानं आपला नफा २० टक्क्यांवरुन ३३.३ टक्क्यांवर नेला. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचं मोठं नुकसान झालं.

वैभव पांड्याने भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटींपेक्षा जास्त रुपये घेऊन स्वत:च्या खात्यावर पैसे वळवले. ही बाब हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला समजली. त्यांनी वैभवला याचा जाब विचारला, त्यावर तुमची बदनामी करु अशी त्याने धमकी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -