Friday, May 10, 2024
Homeताज्या घडामोडीGovinda to enter Shivsena : गोविंदा करणार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश!

Govinda to enter Shivsena : गोविंदा करणार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश!

‘या’ मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

मुंबई : नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Bollywood Actor Govinda) पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार उभा करण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. त्यातच आता महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत गोविंदा प्रवेश करणार आहे. शिवाय त्याला शिवसेनेकडून उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी (North West Lok Sabha Constituency) गोविदांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच गोविंदा शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी या अनुषंगाने गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे गोविंदाकडून त्यांना तगडी फाईट मिळण्याची शक्यता आहे.

याआधी कोणत्या कलाकारांना झाली होती विचारणा?

याआधी गोविंदाने २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती व विजय मिळवला होता. दरम्यान, यापूर्वी या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षीत, नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय कुमार आणि नाना पाटेकरांनी राजकारणात येण्यात स्पष्ट नकार दिला. तर, माधुरी दिक्षीत यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गोविंदाला उमेदवारी देण्याच्या पर्यायाची चाचपणी शिवसेनेकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -