Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीMGNREGA Wage Rates : मनरेगाच्या मजुरांसाठी खुशखबर! मोदी सरकारने वाढवले वेतनाचे दर

MGNREGA Wage Rates : मनरेगाच्या मजुरांसाठी खुशखबर! मोदी सरकारने वाढवले वेतनाचे दर

काय आहेत नवे दर?

नवी दिल्ली : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने मनरेगाच्या मजुरीच्या दरात ३ ते १० टक्के वाढ (MGNREGA Wage Rates) केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) वाढलेले वेतन दर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी (Financial year) आहेत. मनरेगा कामगारांसाठी १ एप्रिल २०२४ पासून नवीन मजुरी दर लागू होतील.

नव्या दरांनुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे. गोव्यात मजुरीच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. गोव्यात सर्वाधिक १०.५६ टक्के वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ ३.०४ टक्के वाढ झाली आहे.

काय आहेत नवे दर?

गोव्यातील कामगारांना पूर्वी ३२२ रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून ३५६ रुपये झाले आहे.

कर्नाटकात मनरेगाचा दर ३४९ रुपये झाला आहे, जो पूर्वी ३१६ रुपये प्रतिदिन होता.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मनरेगा कामगारांचा मजुरी दर २२१ रुपयांवरून २४३ रुपये प्रतिदिन झाला आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरांची रोजची मजुरी २३० रुपयांवरून २३७ रुपये झाली आहे.

हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मनरेगा कामगारांचे दर ७ टक्क्यांनी वाढले आहेत. आता त्यांची रोजची मजुरी २६७.३२ रुपयांवरून २८५.४७ रुपये झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -