Thursday, May 9, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलस्वप्नातील मजा

स्वप्नातील मजा

  • काव्यकोडी: एकनाथ आव्हाड

सर्कशीतले प्राणी
स्वप्नात आले
मलाच त्यांनी
विदूषक केले
सर्कशीत हत्ती
फुटबॉल खेळे
घोडा भरधाव
रिंगणात पळे
कुत्र्याने ओढल्या
मोठाल्या गाड्या
वाघाने जाळातून
मारल्या उड्या
अस्वल आलं
अंग खाजवत
माकड बसलं
पिपाणी वाजवत
गाढवाने पुस्तक
वाचलं रेकून
मांजर गेली
ठुमकत नाचून
शेवटी माझा
आला नंबर
उड्या मारत
झालो हजर
नकला केल्या
मोजून चार
लोकांच्या टाळ्या
मिळाल्या फार
टाळ्यांची मला
होतीच खात्री
झोपलेलं घर मात्र
उठवलं रात्री


१) डिंकासारखा पदार्थ
फेरूला झाडापासून येतो
पचनाच्या तक्रारीवर
घरात वापरला जातो
याचे पाणी प्यायल्यावर
चयापचय क्रिया सुधारते
मसाल्याच्या या पदार्थाचे
सांगा नाव कोणते?

२) मधुमेह नियंत्रित ठेवते
सूज कमी करते
मेंदूच्या कार्यासाठी
उपयोगीसुद्धा ठरते
काळ्या काळ्या रंगाचे
जणू छोटे मणी
बहुगुणी या मसाल्याचे
नाव सांगा कोणी?

३) मेन्थॉल यात असल्यामुळे
शीतलता देते
पोटातील वायुविकारावर
उपयोगात येते
याच्या हिरव्या पानांची
चटणी खासच लागते
कोथिंबीरसारखी जुडी
कोणाची बरं असते ?


उत्तर –
१)पुदिन्याची जुडी
२)मिरे
३)हिंग

eknathavhad23 @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -