Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीFake Weight-loss Medicine: वजन कमी करणारी बनावट औषधे विकणाऱ्या २५० वेबसाइट बंद

Fake Weight-loss Medicine: वजन कमी करणारी बनावट औषधे विकणाऱ्या २५० वेबसाइट बंद

‘या’ संस्थेकडून मोठी कारवाई

मुंबई : सायबर सिक्युरिटी फर्म ब्रँडशील्डने GLP-1 प्रवर्गातील वजन-कमी करणाऱ्या आणि मधुमेहावरील बनावट औषधे विकणाऱ्या २५० हून अधिक वेबसाइट्स हटवल्या आहेत. अशी माहिती कंपनीचे सीईओ योव केरेन यांनी सांगितले. ब्रँडशील्डने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी चयापचय स्थितींवर उपचारांसाठी औषधांची विक्री करणाऱ्या २७९ फार्मसी वेबसाइट्सवर बंदी घातली होती. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक वेबसाइट्स GLP-1 औषधांशी संबंधित होत्या.

तब्बल ६,९०० हून अधिक बनावट औषधं

कंपनीचे सीईओ योआन केरेन म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी ६,९०० हून अधिक बनावट औषधे हटवण्यात आली आहेत. यामध्ये भारतातील ९९२, इंडोनेशियातील ५४४, चीनमधील ३६४ आणि ब्राझीलमधील ११४ औषधांचा समावेश आहे. बेल्जियम, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि GLP-1 च्या इतर बनावट औषधांमुळे घातक परिणाम नोंदवले गेले आहेत, या औषधांद्वारे कंपन्या लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करतात.

GLP-1 म्हणजेच Glucagon-like peptide-1 (ग्लुकागन सारखी पेप्टाइड-१) हा अमिनो ऍसिडवर आधारित पेप्टाइड संप्रेरक आहे, जो विशिष्ट न्यूरॉन्सच्या वतीने मेंदूला संदेश पाठवतो आणि भूक नियंत्रित करतो. नोवो नवीन नॉर्डिस्क (Novo Nordisk) चे (ओझेंपिक) Ozempic आणि Wegovy व Eli Lilly चे मुंजारो (Mounjaro) आणि झेपबाउंड (Zepbound) ही GLP-1 औषधे आहेत, जी टाइप २ मधुमेहासाठी विकसित केली गेली आहेत. तसेच यामुळे भूक कमी आणि पोट अधिक हळू रिकामे होते.

ही औषधे रुग्णांना त्यांचे वजन सरासरी २० टक्के कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी बनावट औषधांचा सुळसुळाट झाला आहे. बेल्जियम, ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड स्टेट्ससह किमान नऊ देशांमध्ये ओझेम्पिक आणि इतर GLP-1 च्या बनावट औषधांमुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -