Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरविद्युत मीटर नसतानाही महिलेला दिले वीज बिल

विद्युत मीटर नसतानाही महिलेला दिले वीज बिल

महावितरणचा भोंगळ कारभार

वाडा (वार्ताहर) : वाडा महावितरणचा सध्या मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले देणे, विजेचा खेळखंडोबा व विद्युत मीटर नसतानाही बिले आकारणे असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. तालुक्यातील रायसल येथील एका महिलेच्या घरात विद्युत मीटर नसतानाही तिला विजेचे बिल देण्यात आल्याने सदर महिलेने तक्रार केली आहे.

तालुक्यातील रायसल या गावात रेश्मा गंगाराम गवारी ही महिला राहात असून सदर महिलेने नवीन मीटर घेण्यासाठी महावितरणकडे ११६५ रुपये भरले आहेत. मात्र, आजतागायत तिच्या घरात विद्युत मीटर बसवण्यात आला नाही. तथापि, असे असतानाही रेश्मा यांना जुलै महिन्याचे ६८ युनिट पडल्याचे दाखवून १८७० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. मीटर बसवलेला नसतानाही वीज बिल आल्याने रेश्मा यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता वाडा यांना तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रेश्मा गवारी यांनी महावितरणला दिला आहे. यासंदर्भात वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -