Tuesday, April 30, 2024
Homeताज्या घडामोडीDead Sea: काय सांगता? कितीही प्रयत्न केले तरीही 'या' समुद्रात बुडणार नाही!

Dead Sea: काय सांगता? कितीही प्रयत्न केले तरीही ‘या’ समुद्रात बुडणार नाही!

जाणून घ्या कुठे आहे ‘हा’ रहस्यमय समुद्र?

जेरुसलेम : पृथ्वीवरील अनेक ठिकाणं पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो तर काही गोष्टी अशा आहेत ज्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. त्यापैकीच पृथ्वीवर एक असा रहस्यमयी समुद्र आहे, ज्यात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बुडणार नाही. तसेच या समुद्राच्या परिसरातील सुंदर दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील, कोणते ठिकाण आहे हे? जाणून घ्या..

पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत आणि असेच एक ठिकाण म्हणजे इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला मृत समुद्र (Dead Sea). हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथील पाणी इतर समुद्राच्या पाण्यापेक्षा १० पट जास्त खारट आहे, ज्यामुळे हा समुद्र इतर जलाशयांपेक्षा खूप वेगळा आहे. या समुद्रातील पाण्यात अधिक प्रमाणात मीठ असल्यामुळे कोणताही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे या समुद्राला ‘मृत समुद्र’ असे नाव देण्यात आले.

मृत समुद्र त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहे. मृत समुद्रातील विशेष बाब म्हणजे त्यात कोणीही बुडू शकत नाही. याच्या पाण्यात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की तुम्ही त्यात झोपले तरी बुडणार नाही. एका बाजूला इस्रायलने वेढलेला मृत समुद्र, तर दुसऱ्या बाजूला जॉर्डनच्या सुंदर टेकड्या आणि वेस्ट बँक हे दृश्य अतिशय सुंदर आहे.

इस्रायलमधील या समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. समुद्राच्या चिखलात हायलुरोनिक ऍसिड आणि त्वचेसाठी फायदेशीर अशी अनेक खनिजे आहेत. येथे येणारे लोक अंगावर मातीची पेस्ट लावून सूर्यस्नान करतात. समुद्रातील औषधी गुणधर्मांचा लाभ घेण्यासाठी आणि कधीच बुडू शकणार नाही यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -