Saturday, April 27, 2024
Homeदेशदाऊदची मुंबईत कोट्यावधींची वसुली!

दाऊदची मुंबईत कोट्यावधींची वसुली!

लष्कर-ए-तोयबा, जैश, अल कायदाला करतो पैशांचा पुरवठा

मुंबई : देशभरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए- मोहंमद आणि अल कायदाला आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची टोळी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवत आहे. मुंबईत मालमत्तांची सौदेबाजी आणि त्यासंबंधित वादांमध्ये मांडवली करीत दाऊद कोट्यवधींची माया जमवत आहे. एनआयने पकडलेल्या डी कंपनीच्या एका हस्तकाची चौकशी करीत असताना ही माहिती उघड झाली आहे.

दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या (टेरर फंडिंग) काही प्रकरणांचा एनआयए तपास करीत आहे. या तपासादरम्यानच पाकिस्तानात लपलेल्या दाऊदची डी कंपनी भारतातून कोट्यवधी रुपये हवाला आणि डिजिटल माध्यमातून थेट लष्कर, जैश आणि अल कायदासारख्या कुख्यात संघटनांना पाठवत आहे. मुंबईतील सलीम फ्रुट हा या कामी दाऊद टोळीची मदत करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एनआयए रडारवरील मोहंमद सलीम मोहंमद इक्बाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुटला ४ ऑगस्टला मुंबई सेंट्रलच्या मीर अपार्टमेंटमधून अटक केले होते. सलीमजवळील काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले होते. सलीम मुंबईत छोटा शकीलच्या नावाने डी-कंपनीचा अवैध व्यवसाय सांभाळत होता. सलीमच्या चौकशीदरम्यान डी-कंपनीच्या इशाऱ्यावर मुंबईत मालमत्ता व्यवहार व बड्या उद्योगपतींमधील वाद मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपये घेऊन थेट लष्कर-ए-तोयबा, जैश, अल कायदाला पाठवल्याचे त्याने सांगितले. याशिवाय डी-कंपनीच्या अवैध अमली पदार्थ व्यवसाय, सोने तस्करी व अन्य माध्यमांतील पैसाही दाऊदच्या इशाऱ्यावर अतिरेकी संघटनांकडे वळवला जात असल्याची माहिती त्याने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -