Wednesday, May 8, 2024
Homeताज्या घडामोडीvande bharat: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

vande bharat: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

मुंबई: गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यातच मुंबईहून शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे.

सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतचा वेग वाढवून लवकरच १३० किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारतचा वेग ८३ किमी प्रति तास इतका आहे. अनेक रेल्वे ट्रॅकची स्थिती इतकी चांगली नाही की वंदे भारत आपल्या १६० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने वंदे भारतचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅकच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा प्रवासातील अर्ध्या तासाचा वेळ वाचेल. यामुळे इगतपुरी-भुसावळ या अन्य रेल्वेंनाही याचा फायदा होईल.

मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २२२२३ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि साईनगर शिर्डी टर्मिनस या दरम्यान चालवली जाते. ही ट्रेन ११.४० मिनिटांनी सीएसटी येथून निघते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी हा प्रवास ५ तास २० मिनिटांचा आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५ स्थानके आहेत. हा प्रवास ३४३ किमीचा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -