Friday, May 3, 2024
HomeदेशKanya Sumangala Yojana: या राज्यात मुलींच्या जन्मानंतर आता मिळणार २५ हजार रूपये

Kanya Sumangala Yojana: या राज्यात मुलींच्या जन्मानंतर आता मिळणार २५ हजार रूपये

लखनऊ: रक्षाबंधनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (up cm yogi adityanath) यांनी मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. बुधवारी लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या(kanya sumangal yojna) लाभार्थींशी संवाद कार्यक्रमादरम्यान त्यांनी या योजनेतील रकमेत वाढ करत असल्याची घोषणा केली.

सीएम योगी म्हणाले, डबलल इंजिनचे सरकार आर्थिक वर्ष २०१४-२५पासून कन्या सुमंगल योजनेची रक्कम १५ हजारांवरून वाढवून २५ हजार करत आहे. यामुळे मुलींना आपली स्वप्ने पूर्ण करणे अधिक सोपे होईल तसेच त्या शिक्षित बनण्यासोबतच आत्मनिर्भर बनतील.

मुलीच्या जन्मानंतर लगेचच मिळणार ५ हजार रूपये

कार्यक्रमात सीएम योगी म्हणाले, आधी या योजनेंतर्गत सहा टप्प्यात १५ हजार रूपये दिले जात होते. मात्र पुढील वर्षांपासून मुलीचा जन्म होताच तिच्या खात्यात तातडीने ५ हजार रूपये दिले जाणार. यासोबतच मुलगी एक वर्षाची झाली की दोन हजार रूपये, मुलगी पहिलीला गेली की तीन हजार रूपये, सहाव्या इयत्तेत गेल्यानंतर तीन हजार रूपये, नवव्या इयत्तेत जाताच पाच हजार रूपये आणि मुलीने ग्रॅज्युएशन अथवा डिप्लोमा अथवा सर्टिफिकेटचा कोणता कोर्स केल्यास तिच्या खात्यात सात हजार रूपये दिले जाणार.

सीएम योगी म्हणाले, आज उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजनेच्या माध्यमातून १६,२४०,०० हजार मुलींना लाभ होत आहे.

निरक्षर महिलांना मिळणार रेशन कार्ड

मुख्यमंत्री योगी म्हणाले, डबल इंजिनचे सरकारचे अशे म्हणणे आहे की मुलगी केवळ मुलगी आहे. तिच्यासोबत कोणत्याही स्तरावर भेदभाव झाला नाही पाहिजे. तिला सुरक्षा, संरक्षण आणि पुढे जाण्याच्या संधी मिळाल्या पाहिजे. त्यांना रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळायला हवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -