Tuesday, May 7, 2024
HomeदेशBharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी...

Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली: बिहारचे(bihar) माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर(karpoori thakur) यांना भारतरत्न दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार आहे. सरकारने ही घोषणा कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे. २४ जानेवारीला त्यांची जयंती आहे.

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. मंगळवारी जदयू नेते केसी त्यागी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासोबतच त्यांच्या नावाने विश्वविदयालय सुरू करण्याची मागणी केली होती.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल साईटवरून कर्पूरी ठाकूर यांचा फोटो शेअर करत लिहिले, मला आनंद आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही अशा वेळेस जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.

 

कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाते. ते काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १९७० ते १९७१ या कार्यकालात काम केले होते. त्यानंतर डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर राहिले. पहिल्यांदा ते सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते आणि दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.

स्वतंत्रता आंदोलनात झाले होते सहभागी, तुरुंगातही गेले होते

कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या पिताँझिया गावात गोकूल ठाकूर आणि रामदुलारी देवी यांच्या घरात झाला होता. विद्यार्थी जीवनात राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते आणि ऑल इंडिया स्टुंड्टस फेडरेशनमध्ये सामील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सामील होण्यासाठी स्नातक कॉलेज सोडले होते. स्वतंत्रता आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी २६ महिने जेलमध्ये घालवले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -