Wednesday, May 1, 2024
Homeनिवडणूक २०२४Ajit Pawar : तर द्रौपदीचा विचार करावा लागेल?

Ajit Pawar : तर द्रौपदीचा विचार करावा लागेल?

मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती

इंदापूर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी येणाऱ्या काळात द्रौपदीचा (Draupadi) विचार करावा लागेल, असा प्रसंग येऊ शकतो, असे वादग्रस्त विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सध्याची वास्तव वस्तुस्थिती सांगितली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यात गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत विधान करताना, भविष्यात सगळंच अवघड होणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. यासंदर्भात सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल, काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात १००० मुले जन्माला आले की त्यावेळेस ८०० ते ८५० मुली जन्माला येत होत्या. मग हा दर ७९० पर्यंत गेला. हे सर्व पाहता यापुढे द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो. परंतु हा गंमतीचा भाग झाला. मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

मोदींसारखा माणूस पाहायला मिळत नाही

अजित पवार म्हणाले की, मी विकास करणारा माणूस आहे. मी आजपर्यंत अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करत होतो, पण त्यांच्यासारखा माणूस सारखा सारखा पाहायला मिळत नाही. त्यांनी अनेक कामे केली आहेत. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही. राहुल गांधींचा चेहरा आपण धरला तर काय चित्र दिसतं तुम्हाला? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थितांना विचारला.

तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या

अजित पवार म्हणाले की, माणूस खरं कोणाशी बोलत असेल तर तो डॉक्टरशी बोलतो. त्यामुळे तुमच्याकडे जर कोणी आलं तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा काय चाललं आहे. जर त्यांनी आमचं नाव घेतलं तर त्यांच्याशी जरा चांगलं बोला आणि जर दुसऱ्याचं नाव घेतलं तर त्यांना जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.

महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत तुम्ही आमच्या खासदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या खासदाराला निवडून द्या. महायुतीचा खासदार आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदारांपेक्षा उजवा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -