Wednesday, May 8, 2024
Homeदेशसेवामुक्तीनंतरही अग्निवीरांना मिळणार निःशुल्क उपचार

सेवामुक्तीनंतरही अग्निवीरांना मिळणार निःशुल्क उपचार

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र सरकारने या अग्नीवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्नीवीरांना २३ व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे.

योजनेला झालेला हा विरोध पहाता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देणाऱ्या घोषणा सुरू केल्या आहे. निमलष्करी दलांमध्ये, राज्यांच्या पोलिस दलांमध्ये ७५ टक्के सेवामुक्त अग्नीवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या आहेत.

याच दरम्यान हवाई दलाने त्यांच्या कोट्यातील ३ हजार अग्नीवीरांची ऑनलाईन भरती मोहीम सुरू केली. पहिल्या केवळ ६ दिवसांत हवाई दलाकडे तब्बल २ लाखांहून जास्त तरूणांनी अर्ज केले. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्नीवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज करण्यात आली.

त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्नीवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून ४ वर्षांनी मुक्त केले जाणा-या ७५ टक्के तरूणांना जे ११.७१ लाख रूपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील असेही स्पष्ट करण्यात आले.

संबंधित अग्नीवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रूग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमीझाल्यास १५ लाखांपासून ४४ लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -