Tuesday, April 30, 2024
Homeदेशभाजपातर्फे देशभर होणार 'दिव्य काशी, भव्य काशी' या उपक्रमाचे विविध कार्यक्रम

भाजपातर्फे देशभर होणार ‘दिव्य काशी, भव्य काशी’ या उपक्रमाचे विविध कार्यक्रम

वाराणसी येथील विकासकामांचे १३ डिसेंबरला लोकार्पण

मुंबई : वाराणसी तथा काशी येथील विकास प्रकल्पांचे (वाराणसी कॉरिडॉर) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी तर्फे देशभर ‘दिव्य काशी, भव्य काशी’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्रात चार ज्योर्तिलिंगांच्या स्थळांसह सुमारे २१०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमांचे प्रदेश संयोजक कृपाशंकर सिंग यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यावेळी उपस्थित होते.

राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असेही सिंग यांनी सांगितले.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील धर्माचार्य, साधू संत, विद्वान-विचारवंत तसेच उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या सामाजिक समरसता, एकता आणि अखंडता यांचे अनोखे दर्शन या कार्यक्रमातून घडेल. राज्यातील ५० साधू – संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

१३ डिसेंबर पासून सुरू होणारे हे कार्यक्रम मकर संक्रांती पर्यंत म्हणजे १४ जानेवारी २०२२ पर्यंत चालतील. १३ डिसेंबर रोजी सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भव्य कार्यक्रम होणार आहेत. देशभरात सुमारे ५१ हजार ठिकाणी ‘दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे भव्य पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

संपूर्ण देशभर १०, ११ व १२ डिसेंबर रोजी सर्व मंदिराच्या तसेच मठ, आश्रमात, अन्य धार्मिक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमात धर्माचार्य, साधू संतांचा गौरव केला जाईल, अशी माहितीही सिंग यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -