Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपच्या विरोधानंतरही कोस्टल रोडचा प्रस्ताव मंजूर

भाजपच्या विरोधानंतरही कोस्टल रोडचा प्रस्ताव मंजूर

मुंबई  : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत भाजपने विरोध केल्यानंतरही कोस्टल रोडसंदर्भात प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. त्यामुळे भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी याविरोधात पालिका मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली.

स्थायी समिती सभेत कोस्टल रोड प्रकल्पासाठी बडोदा पॅलेस ते वांद्रे सी लिंकच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत नेमलेल्या व्यवस्थापन सल्लागाराच्या कंत्राट रकमेमध्ये फेरफार करण्याबाबतच्या प्रस्तावाला भाजपने विरोध केला होता. शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी केला होता. सल्लागाराला, कंत्राटदारांना नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅगनेही त्यावर ताशेरे ओढले असल्याचे शेलार यांनी निदर्शनास आणून दिले होते.

मात्र असे असतानाही सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केला. सल्लागाराला २१५ कोटी अयोग्य पद्धतीने दिले आहेत तर १४२ कोटी कंत्राटदाराला काही काम न करता अधिदान दिले आहे, असे कॅगने समोर आणले आहे. यामुळे बुधावारी कोस्टल रोडच्या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती पटलावर आल्यानंतर भाजप सदस्यांनी त्याला विरोध केला, कोस्टल रोडच्या एकल स्तंभी पाय कामासातिच्या अतिरिक्त शुल्कांच्या वाढीबाबत हा प्रस्ताव होता, तर सल्लागाराचे मूळ कंत्राट मूल्य हे ५७,६१,६०००० एवढे आहे तर अतिरिक्त शुल्क ७,२९,७५,४९२ एवढे आहे, यानंतर आता सल्लागाराचे सुधारित मूल्य ६४,९१,३५,४९२ एवढे झाले आहे. तथापि, कोस्टल रोडचे काम किती झाले? सल्लागारने काय काम केले? किती पैसे घेतले? या सगळ्यांची माहीती देण्याची मागणी भाजप स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.

मात्र आधीच कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचार असल्याचे कॅगने उघड केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्तव आणल्यामुळे शिरसाट यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली होती; मात्र सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावून बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला.

असा आहे कोस्टल रोड

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २,३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन गेल्या वर्षी मुंबईत आणण्यात आले. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असतील. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ किलोमीटर असेल. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४० टक्क्याहून अधिक पूर्ण झाले आहे, तर मलबार हिल येथे समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या महाबोगद्याचे एक किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९०० मीटरपर्यंतचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -