Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीआंतरजातीय विवाह केलेल्या ४३४ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

आंतरजातीय विवाह केलेल्या ४३४ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

नाशिक (प्रतिनिधी) : आंतरजातीय विवाह केलेल्या आणि योजनेच्या चौकटीस पात्र ठरणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होत असते. परंतु शासन स्तरावरून अनुदानाची रक्कम स्थानिक स्तरावर प्राप्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनेक जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १३० जोडप्यांना समाज कल्याण विभागातर्फे ६५ लाख अनुदानाचे वाटप करण्यात आले असले तरी अजुनही ४३४ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना समाज कल्याण विभागातर्फे ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यांचा संसार थाटण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम दिली जात असते. हे अनुदान मिळविण्यासाठी विवाहबद्ध दांपत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमातीतील असणे बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर अनुदान दिले जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाची रक्कम प्राप्त होण्यास अनेक अडचणी उद्भवत होत्या. मात्र दिवाळीत शासनाकडून ६५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून, १३० जोडप्यांना त्याचे वाटप करण्यात आले. त्यात २०१९-२० मधील ५३, २०२०-२१ मधील ७७ जोडप्यांचा समावेश आहे.

१३० दाम्पत्यांना अनुदानरूपी दिवाळीची भेट मिळालेली असली तरीही, २०२०-२१ मध्ये दाखल ७४, आणि २०२१-२२ मध्ये दाखल २३० यांसह सध्याच्या आर्थिक वर्षात दाखल १३० अशा ४३४ जोडप्यांना अद्यापही अनुदान रकमेची प्रतीक्षा आहे. याबाबत शासन स्तरावर अनुदानाची मागणी नोंदविली असून, रक्कम प्राप्त होताच अनुदानाचे वितरण केले जाणार असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -