पालखी सोहळ्या निमित्त १० ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा ९ ते १० जुलै २०२६ या कालावधीत पुणे (Pune) शहरात संयुक्त मुक्काम होणार असून, लाखो वारकरी आणि भाविक शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक (Pune Traffic Adisory) सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले असून, पालखी मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल लागू करण्यात आले आहेत.
Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात होवून कारमधील तीनजण गंभीर जखमी ...
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार हे आदेश लागू केले आहेत. पालखी मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक वळविणे, वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि भाविकांचा प्रवास सुरक्षित ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. (Traffic Update Pune)
अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने तसेच लग्नसमारंभासाठीची वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. (Sant Tukaram Palkhi)
Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. तर पश्चिम ...
भाविकांच्या वाहनांसाठी प्रशासनाने शहरात १० ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था केली आहे. यात रास्ता पेठ येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालय, कॉटर गेट चौकातील ऑर्नेलास हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व कला महाविद्यालय, लक्ष्मी मार्केट, स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय, रफी अहमद किडवाई हायस्कूल, शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय, मार्कंडेय विद्यालय आणि सावित्रीबाई फुले शाळा यांचा समावेश आहे. (Pune Traffic Police)
वाहतूक पोलिसांनी भाविकांना रस्त्यावर कुठेही वाहने उभी न करता केवळ अधिकृत पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीसंदर्भात अधिक माहिती किंवा मदतीसाठी नागरिकांनी पुणे शहर वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षाशी ७२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० या क्रमांकांवर संपर्क साधावा.





