सिडनी : भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही कामगिरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १९.५२ च्या सरासरीने २०३, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३.५५ च्या सरासरीने १४९, टी २० मध्ये १७.७४ च्या सरासरीने ८९ आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २१.५० च्या सरासरीने २८६ बळी घेतले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल बारा वेळा, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अठरा वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया केली आहे. बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया केली आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर – गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चार कसोटी सामन्यांमध्ये बुमराहने ३० बळी घेतले आहे. अद्याप एक कसोटी व्हायची आहे. या सामन्यात आणखी बळी मिळवून कामगिरी अधिक उंचावण्याची संधी बुमराहकडे आहे.
जेव्हा भारतीय कर्णधाराने मेलबर्न कसोटीनंतर घेतली होती निवृत्ती…१० वर्षांनी पुन्हा तेच होणार?
बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामात ९०७ रेटिंग गुण मिळवले आहेत. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ९०४ पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवलेले नाहीत. आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या ८३७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या पॅट कमिन्सने २०१९ मध्ये ९१४ रेटिंग गुण मिळवले होते. कसोटी क्रिकेटमध्ये ९१४ रेटिंग गुण ही गोलंदाजांमधील आतापर्यंतची सर्वोत्तम वार्षिक कामगिरी आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या दुसऱ्या स्थानी असलेल्या जोश हॅझलवूडने ८४३ रेटिंग गुण मिळवले आहेत.
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने घेतली झेप, भारताची घसरण
कसोटीत सर्वोच्च रेटिंग गुण मिळवणारे भारतीय गोलंदाज
९०७ रेटिंग गुण – जसप्रीत बुमराह – २०२४
९०४ रेटिंग गुण – आर. अश्विन – २०१६
८९९ रेटिंग गुण – रवींद्र जडेजा – २०१७
८७७ रेटिंग गुण – कपिल देव – १९८०
८५९ रेटिंग गुण – अनिल कुंबळे – १९९४
८११ रेटिंग गुण – विनू मांकड – १९५२
८०६ रेटिंग गुण – सुभाष गुप्ते – १९५६