Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाकसे असणार टीम इंडियाचे २०२५मधील वेळापत्रक...घ्या जाणून

कसे असणार टीम इंडियाचे २०२५मधील वेळापत्रक…घ्या जाणून

मुंबई: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. २०२४ हे वर्ष टीम इंडियासाठी संमिश्र ठरले. काहीवेळा पराभव तर काही ठिकाणी टीम इंडियाचा विजय झाला. या वर्षातील सर्वात मोठी बातमी म्हणजे टीम इंडियाने टी-२- वर्ल्डकप

मेलबर्न कसोटीत सोमवारी भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यात भारताला हरवले. दरम्यान, आता नव्या वर्षात शेवटची आणि पाचवी कसोटी असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारत मालिकेत बरोबरी साधणार हे पाहावे लागेल.

दरम्यान, २०२५मध्ये भारतीय संघ कोणकोणत्या मालिका खेळणार आहे हे समोर आले आहे.

२०२५मधील भारताचे महत्त्वाचे सामने

भारत विरुद्ध इंग्लंड(२२ जानेवारी-१२ फेब्रुवारी)

या वर्षाची सुरूवात भारत घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिकेने करत आहे. यात पाच टी-२० तर तीन वनडे सामन्यांचा समावेश असेल. मालिकेची सुरूवात टी-२० सामन्यातून होईल. टी-२० नंतर वनडे मालिका खेळवली जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी(१९ फेब्रुवारी – ९ मार्च)

भारतीय क्रिकेट संघ २०२५मध्ये आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळणार आहे. याची सुरूवात १९ फेब्रुवारीपासून होईल. तर फायनल सामना ९ मार्चला खेळवला जाईल.

आयपीएल २०२५(मार्च-जून)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर आयपीएलची स्पर्धा रंगू शकते. दरम्यान, आयपीएलच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत मात्र साधारणपणे मार्च ते जून पर्यंत ही स्पर्धा रंगू शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ११ ते १६ जून २०२५दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ अद्याप पोहोचलेला नाही.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका रंगणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया पाच कसोटी सामने खेळेले. जिंकला. २००७नंतर भारताने पहिल्यांदाच हा वर्ल्डकप जिंकला. दरम्यान, २०२४मधील शेवटच्या सामन्यात भारताच्या पदरी निराशा पडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -