Wednesday, May 27, 2026

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि. (१७.८५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६१ दिवस म्हणजेच किमान दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने आणि अल निनो वादळाचा प्रभाव, त्याचा पावसावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतून दररोज ४,२०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे, भिवंडी महापालिकेचा २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा समाविष्ट आहे. आगामी काळात मुंबईसह राज्यात अल निनो वादळाचा प्रभाव असेल. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे. त्यासाठीच मुंबई महापालिकेने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.पालिकेने राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी अगोदरच केली होती. त्याला सरकारकडूनदेखील मंजुरी मिळाल्याचे समजते. त्यामुळे यदाकदाचित सात तलावांतील पाणीसाठा संपुष्टात आल्यास राखीव कोट्यातून पाणीपुरवठा करण्याची तजवीज महापालिकेने अगोदरच करून ठेवली आहे. मात्र वेळेत पाऊस न पडल्यास आणि संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्यास मुंबईला आणखीन मोठ्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.

">पर्यायी स्रोत निर्माण होईपर्यंत संकट कायम लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, दररोज होणारा अपुरा पालिकेने मुंबई शहराची वाढती पाणीपुरवठा पाहता पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी एकीकडे सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेने गारगाई हे नवीन धरण बांधण्याचे कामदेखील हाती घेतले आहे. नवे पाणी प्रकल्प निर्माण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा