MUMBAI : जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या आयपीएलमध्ये आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)सध्या आयपीएलमध्ये मोठ्या बदलाच्या विचारात आहे. आयपीएल टी-२० लीग दरवर्षी मार्च ते मे दरम्यान आयोजित केली जाते. बीसीसीआय सध्या भविष्यात दोन टप्प्यांत आयोजित करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना वर्षातून दोनदा आयपीएलचा मनोरंजन पहायला मिळू शकतो.सध्या आयपीएलमध्ये 74 सामने खेळवले जातात. मात्र पुढील काही वर्षांत सामन्यांची संख्या वाढवून 94 करण्याचे विचार केले जात आहे. एवढे सामने सलग दोन महिन्यांत खेळवणे कठीण आहे. त्यामुळे स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याचा पर्याय समोर आला आहे.
मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुजरात टायटन्सचा (GT) तब्बल ९२ धावांनी पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक ...
दोन टप्प्यांत होऊ शकते IPL
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या फ्यूचर टूर प्रोग्राम आणि ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा सकारात्मक झाल्यास आयपीएल दोन भागांत खेळवला जाऊ शकतो. प्रस्तावानुसार पहिला टप्पा फेब्रुवारीच्या अखेरीपासून एप्रिलपर्यंत, तर दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
कधीपासून होणार नवे नियम ?
बीसीसीआय 2027 नंतरच्या आयपीएलमध्ये हे बदद्ल करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे 2028 पासून चाहत्यांना वर्षातून दोनदा आयपीएलचा जल्लोष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला खेळला जाणार आहे. मुल्लानपूरच्या ...
एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील अनेक भागांत प्रचंड उष्णता आणि दमट हवामान असतो. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेस आणि दुखापतींच्या समस्या वाढतात. या हंगामातही अनेक संघांचे खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले होते. याचा थेट पराभाव संघांवर झाल्याचा दिसला.
आयपीएल २०२६ मधील दुखापत खेळाडू
चेन्नई सुपर किंग्स: नॅथन एलिस (हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर), एम.एस. धोनी (पोटरीच्या स्नायूला ताण आल्यामुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही), जेमी ओव्हरटन (मांडी), आयुष म्हात्रे (हॅमस्ट्रिंग फाटणे), खलील अहमद (क्वाड्रिसेप्स फाटणे), आणि रामकृष्ण घोष (पायाचे फ्रॅक्चर).
कोलकाता नाईट रायडर्स: हर्षित राणा (गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर), मथिशा पाथिराना (पोटरीच्या स्नायूला ताण), आणि आकाश दीप (पाठीच्या खालच्या भागाला ताण).
राजस्थान रॉयल्स: सॅम करन (जांघेच्या दुखापतीमुळे बाहेर) आणि रवी सिंग (त्याच्या जागी इमानजोत चहल).
सनरायझर्स हैदराबाद: जॅक एडवर्ड्स (पायाच्या दुखापतीमुळे बाहेर) आणि पॅट कमिन्स (कंबरेच्या स्नायूला ताण).
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर: जोश हेझलवूड (हॅमस्ट्रिंग/अकिलीस).
मुंबई इंडियन्स: अथर्व अंकोलेकर (गुडघा) आणि रोहित शर्मा (हॅमस्ट्रिंग)
सणासुदीचा हंगाम ठरणार फायदेशीर
यंदाच्या हंगामात आयपीएलची वीवर्षीप मागील काही हंगामांपासून कमी झाली आहे. त्यामुळे हा नवा नियम आयपीएलला अर्थिक फायदा देऊ शकतो.सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारतात सणासुदीचा काळ सुरू असतो. या काळात जाहिराती आणि ब्रँड प्रमोशन मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे ब्रॉडकास्टर्स आणि आयपीएल व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.




