मेलबर्न : बॉर्डर – गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील मेलबर्न कसोटी गमावलेल्या भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये घसरण झाली. मेलबर्नची कसोटी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये झेप घेतली.
Australia vs India : मेलबर्नमध्ये भारताचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानी आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी सामना रंगेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
WTC Final मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला, पाकिस्तानला हरवत मिळवले स्थान
दक्षिण आफ्रिकेने ११ पैकी ७ कसोटी सामने जिंकले आणि एक अनिर्णित राखला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे प्रमाण ६६.६७० टक्के आहे. विजयाची सर्वाधिक टक्केवारी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा सामना कोणाशी होणार हे लवकरच ठरणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा जास्त वरचढ दिसत आहे.
Sunil Gavaskar : सुनील गावस्करांना पाहता नितीश कुमारचे वडील झाले भावूक
ऑस्ट्रेलियाने १६ पैकी १० कसोटी सामने जिंकले आणि दोन अनिर्णित राखले. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे प्रमाण ६१.४६० टक्के आहे. भारताने १८ पैकी ९ कसोटी सामने जिंकले आणि दोन अनिर्णित राखले. यामुळे भारताच्या विजयाचे प्रमाण ५२.७८० टक्के आहे. इतर कसोटी दर्जा प्राप्त संघांच्या विजयाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.