Wednesday, May 27, 2026

IPL संपलं, आता FIFA World Cup 2026 चा फिव्हर! विराटपासून धोनीपर्यंत… कोणता भारतीय क्रिकेटर कुठल्या फुटबॉल स्टारचा फॅन?

IPL संपलं, आता FIFA World Cup 2026 चा फिव्हर! विराटपासून धोनीपर्यंत… कोणता भारतीय क्रिकेटर कुठल्या फुटबॉल स्टारचा फॅन?

IPL 2026 आता शेवटच्या टप्प्यात आहे. ३१ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना आहे. त्यानंतर क्रिकेटप्रेमींचं लक्ष थेट FIFA World Cup 2026 कडे वळणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये रंगणाऱ्या या फुटबॉलचा थरार 11 जूनपासून सुरू होणार आहे. भारतातही फुटबॉलचा फिव्हर चढू लागला आहे. भारतीय क्रिकेटपटूही यात मागे नाहीत. अनेक भारतीय क्रिकेट स्टार्स हे जागतिक फुटबॉलपटू आणि युरोपियन क्लब्सचे जबरदस्त चाहते आहेत. हे अधून मधून दिसून आले आहे.

विराट कोहली CR7 चा फॅन

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली हा पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचा मोठा फॅन मानला जातो. रोनाल्डो ज्या क्लबकडून खेळला, त्या क्लब्सकडे विराटचं आकर्षण वाढताना दिसलं आहे. रोनाल्डोमुळे विराट मँचेस्टर युनायटेडचा फॅन बनला होता. नंतर रोनाल्डो रिअल माद्रिद आणि अल-नासरकडे गेल्यानंतर विराटही त्या क्लब्सवर लक्ष ठेवताना दिसला आहे.

रोहित शर्मा रिअल माद्रिदचा समर्थक

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा स्पेनच्या रिअल माद्रिद क्लबचा मोठा फॅन आहे. रोहित ला लिगाचा ब्रँड अॅम्बेसेडरही राहिला आहे. फुटबॉलवरील त्याचं प्रेम अनेक वेळा सोशल मीडियावर दिसून आले आहे.

एम.एस. धोनी

एमएस धोनीला फुटबॉलची विशेष आवड आहे. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो गोलकीपर म्हणून फुटबॉल खेळायचा. आजही धोनी मँचेस्टर युनायटेडचा समर्थक आहे. क्रिकेट दौऱ्यांदरम्यान धोनी आणि भारतीय संघ फुटबॉल खेळतानाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत.

कुलदीप यादवचं फुटबॉलसाठी स्वतंत्र YouTube चॅनल आहे

टीम इंडियाचा फिरकीपटू कुलदीप यादव फुटबॉलचा एवढा मोठा चाहता आहे की त्याचा स्वतःचा फुटबॉलवर आधारित YouTube चॅनल आहे. Cricket is my game, football is my passion, असं तो स्वतः म्हणतो. कुलदीप हा ब्राझीलच्या दिग्गज खेळाडु नेयमारचा मोठा फॅन आहे. त्याचबरोबर तो परिमेरे लीगच्या लिव्हरपूल कल्बला सपोर्ट करतो.

सिराजचं SIUU सेलिब्रेशन

मोहम्मद सिराज विराट कोहलीप्रमाणेज हा देखील क्रिस्टियानो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे. विकेट घेतल्यानंतर तो अनेकदा रोनाल्डोच्या प्रसिद्ध SIUU सेलिब्रेशनची स्टाईल करताना दिसतो.

युवराज, बुमराह आणि मँचेस्टर युनायटेड कनेक्शन

युवराज सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही मँचेस्टर युनायटेडचे चाहते आहेत. बुमराह आणि पत्नी संजना गणेशनसोबत ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमलाही भेट दिली होती. भारतात मँचेस्टर युनायटेडचे मोठ्या प्रमाणावर चाहते असल्याचे मानले जाते.

ऋषभ पंत लिव्हरपूलचा फॅन

टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत हा लिव्हरपूल क्लबचा मोठा समर्थक मानला जातो. सोशल मीडियावर तो अनेकदा लिव्हरपूल जर्सीतील फोटो शेअर करताना दिसला आहे.

केएल राहुल आर्सेनलचा फॅन

केएल राहुलला बालपणापासून फुटबॉलची विशेष आवड आहे. तो इंग्लिश प्रीमियर लीगमधील आर्सेनल क्लबचा फॅन आहे. राहुल द्रविडलाही आर्सेनल आणि माजी प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांच्याबद्दल विशेष आकर्षण असल्याचं म्हटलं जातं.

सौरव गांगुलीपासून सचिनपर्यंत फुटबॉलची क्रेझ

सौरव गांगुली हा कोलकात्याच्या मोहन बागान क्लबपासून मँचेस्टर युनायटेडपर्यंत अनेक संघांचा चाहता आहे. तर सचिन तेंडुलकर ISL मधील केरळा ब्लास्टर्सचा सहमालक राहिला होता. सचिन स्वतः फुटबॉल उत्तम खेळतो.

IPL नंतर फुटबॉलचा महासंग्राम

IPL 2026 संपल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष आता FIFA World Cup 2026 कडे लागलं आहे. क्रिकेट स्टार्सचे आवडते फुटबॉलपटू आणि क्लब्स यामुळे चाहत्यांमध्येही फुटबॉलची उत्सुकता अधिक वाढताना दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >