मुंबई : भारतीय संघ(team india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील चौथा सामना मेलबर्नमध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकला. यामुळे यजमान संघ पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३४० धावांचे आव्हान मिळाले होते.
या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तिबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की रोहित सिडनी सामन्यानंतर निवृत्ती घेईल. हे असेच वातावरण याआधीही होते. १० वर्षांपूर्वी मेलबर्न कसोटीनंतर असेच वातावरण बनले होते. तेव्हा भारताचा कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती.
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने घेतली झेप, भारताची घसरण
धोनीने ३० डिसेंबर २०१४मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती. तेव्हा शेवटच्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हातात कमान सोपवण्यात आली होती. आताही असेच काहीसे वातावरण झाले आहे. फरक इतकाच आहे की भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी अनिर्णीत झाली होती. यानंतर धोनीने निवृत्तीची घोषणा केली होती.
मात्र यावेळेस मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला आहे. तर कर्णधार रोहितने निवृत्ती घेतली आहे. मात्र वातावरण तसेच काहीतरी बनत आहे. कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. २००५मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये ९० कसोटी सामने खेळले. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली. यात त्याने ४८७६ धावा केल्या.
धोनीने ६० कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात २७ कसोटी सामने जिंकले. अखेरीस धोनीने १५ ऑगस्ट २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.