Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीShare Market : शेअर मार्केटच्या भूकंपानंतर 'या' कंपनीने गाठला उच्चांक!

Share Market : शेअर मार्केटच्या भूकंपानंतर ‘या’ कंपनीने गाठला उच्चांक!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Loksabha Election Result 2024) दिवशी शेअर बाजारात (Share Market) भूकंप झाला. या वातावरणामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचा जवळपास १० लाख रुपयांचा चुराडा झाला होता. मात्र या शेअर बाजाराने पुन्हा यू-टर्न घेतला आहे. शेअर मार्केटच्या भूकंपानंतर एका वाहन कंपनीने तुफान स्पीड पकडला असून उच्चांक गाठला आहे.

या कंपनीने गाठला उच्चांकी स्तर

शेअर्स खरेदीसाठी उड्या दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) लिमिटेडचा शेअर आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ८.७ टक्क्यांनी वाढून ५,७७५ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर आहे. हीरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये आतापर्यंत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, या शेअरने वर्ष २०२४ मध्ये ३८ टक्के सकारात्मक परतावा दिला आहे. हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा (५८ टक्के परतावा) आणि बजाज ऑटो (४० टक्के परतावा) हे निफ्टी ५० निर्देशांकातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणारे शेअर्स आहेत. तसेच ग्रामीण वापरातील वाढ किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवन हे हीरो आणि बजाज ऑटोसारख्या दुचाकी उत्पादकांसाठी फायदेशीर आहेत. आणि त्यांच्या एन्ट्री लेव्हल बाईकची विक्री वाढण्याची शक्यता आहे, असे शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कंपनीचा तिमाही निकाल

गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत हीरो मोटोकॉर्पचा नफा १६.७ टक्क्यांनी वाढून ९४३.४६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या (जानेवारी ते मार्च) तिमाहीत कंपनीचा नफा ८१०.८० कोटी रुपये होता. या तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न ९,६१६.६८ कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षी या कालावधीत ८,४३४.२८ कोटी रुपये होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -