Saturday, May 30, 2026

Rajasthan Sandstorm : राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर! भरदिवसा अंधार, ताशी ७० किमी वेगाने धुळीचा तांडव; वाहतूक ठप्प

Rajasthan Sandstorm : राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर! भरदिवसा अंधार, ताशी ७० किमी वेगाने धुळीचा तांडव; वाहतूक ठप्प

जयपूर : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला मिळाला. चुरू आणि श्रीगंगानगर परिसरात दुपारी सुमारे २ वाजता अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि प्रचंड वाळू-धुळीचे वादळ उसळले. काही क्षणांतच आकाश काळवंडले आणि भरदिवसा अंधार पसरला, ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. (Rajasthan Sandstorm)

दृष्यमानता शून्य; रस्त्यांवर वाहनांची कोंडी :

या धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली, तर चालकांना पुढील काही मीटरही दिसत नसल्याने हेडलाइट्सचा आधार घ्यावा लागला. अनेक भागांमध्ये नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घरातच थांबणे पसंत केले. (Rajasthan Sandstorm)

ताशी ७० किमी वेगाने ३० मिनिटांचा तांडव : 

हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ७० किमी इतका नोंदवला गेला. जवळपास 30 मिनिटे वाळू आणि धुळीचे ढग आकाशात फिरत राहिले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Rajasthan Sandstorm)

वादळानंतर पावसाची हजेरी; तापमानात मोठी घट :

या वादळानंतर लगेचच हवामानाने वेगळेच रूप घेतले. धूळ खाली बसताच आकाश ढगाळ झाले आणि अनेक भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसच्या वर असलेले तापमान अचानक खाली आले. हवामान विभागानुसार, या बदलामुळे तापमानात सुमारे ८ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली असून, नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. (Rajasthan Sandstorm)

देशातील इतर राज्यांमध्येही हवामानाचा कहर :

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्येही मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. बिहारमध्ये वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाटणामध्ये पावसामुळे विमानसेवा विस्कळीत, अनेक उड्डाणांना उशीर. उत्तर प्रदेशमध्ये मेघगर्जना आणि वादळामुळे ३१ जणांचा मृत्यू. सहारनपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी. (Rajasthan Sandstorm)

मान्सूनबाबत हवामान विभागाचा अंदाज :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ७ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rajasthan Sandstorm) IMD च्या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हंगामात सुमारे ७८ सेमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, राष्ट्रीय सरासरी ८७ सेमी मानली जाते. (Rajasthan Sandstorm)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >