Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीSchool Bus Owners : प्राथमिक शाळांबाबतच्या 'त्या' शासन निर्णयाला स्कूल बस चालकांचा...

School Bus Owners : प्राथमिक शाळांबाबतच्या ‘त्या’ शासन निर्णयाला स्कूल बस चालकांचा विरोध

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी घेण्यात आला होता ‘तो’ निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी (Maharashtra School) राज्य शासनाने (State Government) काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. पूर्व प्राथमिक (Pre-Primary School) ते चौथीपर्यंतच्या शाळा (Primary School) या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला स्कूलबस मालकांनी (School Bus Owners) विरोध दर्शवला आहे.

शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे. सकाळी नऊ वाजता जर शाळा भरत असेल तर, मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक अवरमध्ये (Peak hour) स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत, ही मोठी अडचण असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे.

विद्यार्थ्यांची ने-आण करणे कठीण होईल

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाही. यामुळे स्कूलबसच्या एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या लागणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांची ने-आण करणे, हे अधिक अडचणीचे होणार असून यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे.

स्कूलबस भाडे २४ ते ४० टक्के वाढविण्याचा इशारा

सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. स्कूलबसचे भाडे २४ ते ४० टक्क्यांनी वाढवणार, असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवाय काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -