मराठी भाषा दिन

मायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र

संतांची परंपरा लाभलेली, शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासात भेटलेल्या अनेक भाषांना आपलेसे करत विकसित झालेली आणि आधुनिक युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणा-या १० भाषांत स्थान पटकावणारी अशी ‘माझी बोली मराठीया’. […]

मराठीविषयी आदर!- सलमान खान

salman_motherमाझी आई मराठी आहे, हे मी अनेक वेळा सांगितलं आहे. त्यामुळे आमच्या घरातलं वातावरणही काहीसं मराठमोळं असतं. आम्ही दरवर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करतो. त्यावेळी मी इतर सर्व कार्यक्रम सोडून घरीच असतो. त्या दीड दिवसांमध्ये सर्व विधी यथासांग केले जातात.

महाराष्ट्रात मी मराठी का बोलतो?

marathi

माझी आई अशिक्षित आहे. ती फक्त मराठी बोलते. तिला हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा ए, बी, सी, डी माहीत असण्याचे काही कारण नाही. पण परळसारख्या मराठीबहुल परिसरात राहतानाही तिचे हिंदी आणि इंग्रजीशिवाय काही अडलेले नाही. […]

आईचं देणं!

marathi_homeमाझे कितीतरी असे मित्र आहेत, ज्यांना अजूनही आश्चर्य वाटतं.. यतीन गुजराथी भाषिक असूनही त्याचं मराठी इतकं चांगलं कसं? हाच प्रश्न माझ्याकडे आलेल्या नव्या रुग्णांही पडतो. याचं उत्तर आहे, माझी आई-लीला पटेल.

पॉडकास्ट- आगगाडी व जमीन (कविता)

marathi_home

मराठी दिना निमित्त कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची आगगाडी व जमीन  कविता ऐका संपादक महेश म्हात्रे यांच्या आवाजात… कविता ऐकण्यासाठी क्लिक करा…

ऊर्दू शाळांतही मराठीवर भर द्यावा!

marathi_home

माझी मातृभाषा जरी ऊर्दू असली तरी बोलीभाषा मराठी असल्याकारणाने दैनंदिन जीवनात ती कानांवर पडू लागली, हळूहळू तिची गोडी जाणवू लागली आणि आज मला मराठी भाषा खूप जवळची वाटते. ऊर्दू जरी माझी मातृभाषा असली तरी मराठी भाषेने माझं संगोपन केलं आहे. माझी जडणघडण केली आहे.

विश्वकोशाचे ३ खंड आज संकेतस्थळावर

vishvkoshमराठी विश्वकोशाचे सर्व खंड आता इंटरनेटवर उपलब्ध होणार आहेत.

लावा मराठीचा टिळा!

marathi_home२७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षापासून तो राज्य सरकारतर्फेही साजरा करण्यात येणार आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण, हा दिवस केवळ तेवढ्या काळापुरताच मर्यादित न राहता तो वर्षाचे ३६५ दिवस साजरा केला पाहिजे. ज्या कविश्रेष्ठांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो, त्या कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा […]

परभाषेतही व्हा पारंगत, मायमराठी जपा तरी

Arnika Paranjapeमराठीचा -हास होतोय, अशी सर्वत्र ओरड सुरू आहे. त्यात हल्लीचे तरुण दोन वाक्यदेखील अस्खलित मराठीतून बोलू शकत नाहीत. दोन वाक्यांमध्येही सर्रास इंग्रजी शब्द वापरले जातात. कधी तो कामाचा भाग असतो तर कधी प्रतिष्ठेचा! पण मनातील मराठी भाषेविषयीची आस्था कमी होत नाही. विविध क्षेत्रांतील तरुणांना मराठीविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

वेब रेडिओ : मराठीतून शिक्षणाचा नवा श्राव्य उपक्रम

WEB_RADIO‘‘नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओ.पी.एन. १०१ (अध्ययनासाठी संवाद कौशल्ये) या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..’’ हे संवाद कोणत्याही महाविद्यालयातील वर्गातले नसून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी या वेब रेडिओवरील आहेत.

मराठी आता स्मार्टफोनवरही..

Marathi Mobileजागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीची व्याप्ती ख-या अर्थाने जागतिक करण्यासाठी मराठीचं डिजिटल स्वरूप अधोरेखित करण्याची गरज आहे. युनिकोडच्या माध्यमातून मराठी आता प्रकाशन व्यवसाय, वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल यांच्यापुरतीच सीमित न राहता संकेतस्थळ, ब्लॉग्ज, ई-बुक या माध्यमांतून अनेक औद्योगिक आस्थापना, बँका, सरकारी यंत्रणा, सार्वजनिक उपक्रम अशा ठिकाणी पोहोचली आहे. हा मराठीचा ‘ऑनलाइन प्रसार’ टिकवणे आणि वाढवणे आपल्याच […]

मराठी अभिमानगीत

marathi_homeलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी