Thursday, May 9, 2024
Homeताज्या घडामोडीManhole Deaths: मॅनहोलमध्ये वाकून काम करताना कामगाराच्या अंगावरुन गेली कार

Manhole Deaths: मॅनहोलमध्ये वाकून काम करताना कामगाराच्या अंगावरुन गेली कार

मुंबई: गोवंडीमध्ये मॅनहोलमध्ये (Manhole) सफाई करण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेज लाईन साफ ​​करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या अंगावर कार गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना ११ जून रोजी घडली असली तरी आता या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

जगवीर यादव (३७) हा कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरात ड्रेनेज लाईन साफ ​​करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला होता. तो आत वाकून काम करत होता व त्याच्या शरीराचा अर्धवट भाग मॅनहोलच्या वर होता. त्यावेळी एक हुंडाई कार आली आणि त्याच्या अंगावरून गेली. त्यामुळे तो मॅनहोलमध्येच अडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कंत्राटदार अर्जुन प्रसाद शुक्लासह कार चालक विनोद उधवानी याला अटक करुन दोघांवर कलम २७९, ३३६, ३३८ आणि ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मुंबईतील गोवंडी परिसरात काल अशीच घटना घडली होती. शिवाजी नगर भागात मुंबई महानगरपालिकेकडून मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण  निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -